Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाबाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी दरम्यानचा 520 किलोमीटरचा मार्ग गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर मात्र पाच तासात प्रवाशांना पार करता येत आहे. यामुळे नागपूरवासीयांचे तसेच विदर्भमधील भाविकांना साईबाबांचे दर्शनाला जाताना सोयीचे झाले आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे सातारा, नाशिक, कोल्हापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस पडणार मुसळधार पाऊस, येलो अलर्ट जारी
नागपूर ते शिर्डी हा प्रवास सुपरफास्ट झाल्यानंतर आता या महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई हा वाहतुकीसाठी केव्हा सुरू होईल हाच मोठा प्रश्न नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित होत होता. दरम्यान, आता या दुसऱ्या टप्प्यातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गाचा शिर्डी ते भरविर हा 80 किलोमीटरचा टप्पा बांधून पूर्ण झाला आहे. अर्थातच आता हा टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी खुला होणार आहे.
केव्हा सुरू होणार शिर्डी ते भरवीरचा टप्पा
राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार शिर्डी ते भरवीर पर्यंतचा समृद्धी महामार्गाचा महत्त्वाचा टप्पा पुढील महिन्यात म्हणजेच मे 2023 मध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर शिर्डी ते भरवीर हे अंतर मात्र 40 मिनिटात पार करता येणार आहे.
विशेष म्हणजे नागपूर ते भरवीर पर्यंतचे अंतर केवळ आणि केवळ सहा तासात पार होणार असल्याची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे. वास्तविक हा शिर्डी ते भरवीर दरम्यान चा टप्पा मार्च महिन्यातच पूर्ण करण्याचे टार्गेट होते.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ महत्त्वाचा पूल पुढल्या महिन्यात सुरु होणार, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा, पहा…
मात्र काही कारणास्तव हा टप्पा मार्चमध्ये पूर्ण झाला नाही, मात्र आता एप्रिल महिन्यात या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून हा मार्ग पुढच्या महिन्यात म्हणजेच मे मध्ये सुरू होणार आहे. परंतु मे महिन्यातील कोणत्या तारखेला हा शिर्डी ते भरवीर पर्यंतचा मार्ग सुरु होईल याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही.
विशेष म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळाने जुलै पर्यंत भरवीर ते इगतपुरीचा टप्पा देखील पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे. एकंदरीत आता समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच याचे उर्वरित काम पूर्ण होईल आणि संपूर्ण समृद्धी महामार्ग हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! आगामी पाच ते सहा दिवस ‘या’ विभागात पडणार अवकाळी पाऊस, गारपीटही होणार, पहा….