Mhada Deposit Rule Change : म्हाडा कडून नागरिकांना परवडणाऱ्या दरात महानगरांमध्ये घर उपलब्ध करून दिली जातात. मुंबई पुणे नासिक औरंगाबाद यांसारख्या महानगरात म्हाडा कडून ही घरे उपलब्ध करून दिले जातात. शहरात दिवसेंदिवस वाढणारी घरांची किंमत पाहता म्हाडाच्या घरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळतो. यासाठी मात्र म्हाडाकडून एक विशिष्ट अशी प्रक्रिया राबवली जाते.
म्हाडा कडून घरांची सोडत काढली जाते. सोडतसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक नागरिकांना या घरांसाठी अर्ज करावा लागतो. अर्ज करताना मात्र अनामत रकमेसह अर्ज सादर करावा लागतो. अनामत रक्कम ही 5000 ते 75 हजार याप्रमाणे उत्पन्न गटानुसार वेगवेगळी असते.
अनामत रक्कम भरल्यानंतर या अर्जदारापैकी पात्र लोकांची प्रारूप यादी जाहीर होत असते. यानंतर मग अंतिम यादी जाहीर होते. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर मग या घरांसाठी लॉटरी काढली जाते. लॉटरी मध्ये निवड झालेल्या लोकांना घर दिले जातात. जे लोक लॉटरीमध्ये अयशस्वी ठरतात, त्यांना मात्र म्हाडा कडून अनामत रक्कम परत केली जाते.
हे पण वाचा :- लालपरीत महिलाराज! महिलांना एसटीमध्ये 50 टक्के तिकीट दरात सवलत; पण यामुळे नाराजगी कायमच, वाचा सविस्तर
नियमानुसार ही रक्कम म्हाडाला सात ते आठ दिवसात संबंधित अयशस्वी झालेल्या अर्जदारांना परत करावी लागते. मात्र अनेकदा चुकीचा बँक खाते क्रमांक किंवा बंद पडलेला बँक खाते क्रमांक अर्जदार व्यक्तीकडून दिला जातो. अशा परिस्थितीत म्हाडाकडून मिळणारी ही अनामत रक्कम संबंधित व्यक्तीला वेळेवर मिळत नाही. ही रक्कम मिळवण्यासाठी अर्जदाराला कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. म्हाडाच्या या कारभारामुळे मात्र कायमच त्यांच्यावर टीका होते.
दरम्यान आता यावर रामबाण उपाय म्हाडाने काढला आहे. आता कोकण मंडळाच्या सोडतीपासून म्हाडाने पिनी टेस्टिंग या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता म्हाडाच्या घरांसाठी अर्जदाराने बँक खाते नमूद केल्यानंतर मंडळाकडून या खात्यात एक रुपया जमा केला जाणार आहे. एक रुपया संबंधित बँक खात्यात यशस्वीरित्या जमा झाल्यानंतर हे बँक खात बंद आहे की चालू आहे याची कल्पना येऊ शकणार आहे.
हे पण वाचा :- एसटी कर्मचाऱ्यांना मराठी नवीन वर्षात मिळणार ‘ही’ भेट; महामंडळाने घेतला निर्णय
म्हणजेच बँक खात्याची या ठिकाणी पडताळणी होणार आहे. यामुळे बँक खाते क्रमांक योग्य असल्याची खात्री केली जाणार आहे. त्यानंतरच मग अर्जदाराला अनामत रक्कम भरता येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता या पिनी टेस्टिंग पद्धतीच्या माध्यमातून बँक खात्याची पडताळणी सुरुवातीलाच होणार असल्याने सोडतीत अयशस्वी ठरलेल्या अर्जदाराची परताव्याची रक्कमही याच खात्यात जमा करण्यात येणार आहे.
त्यामुळे अनामत रक्कमेचा परतावा वेळेत होणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष अशी की, मंडळाने सुरुवातीला खात्यात भरलेला एक रुपया अर्जदारांना म्हाडाला परत करावा लागणार आहे. निश्चितच या पिनी टेस्टिंग पद्धतीमुळे म्हाडाच्या लॉटरी मध्ये यशस्वी ठरलेल्या लोकांना वेळेत अनामत रक्कम परत मिळू शकणार आहे.
हे पण वाचा :- पंजाबरावांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज ! ‘या’ तारखेला मुसळधार पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात राहणार अवकाळी?, पहा….