शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; या लोकांना घर बांधण्यासाठी ‘इतकी’ ब्रास वाळू मिळणार फ्री, पहा…..

Eknath Shinde Cabinet Meeting Decision

Maharashtra News : शिंदे फडणवीस सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेला स्वस्तात वाळू मिळावी यासाठी नवीन धोरण राबवले जात आहे. या निर्णयानुसार आता शासकीय वाळू डेपोतून लोकांना स्वस्तात वाळू मिळत आहे. 600 रुपये ब्रासने वाळू देण्याचे शासनाने जाहीर केले आहे.

दरम्यान आता राज्यातील काही लोकांना मोफत वाळू देण्याचा देखील शासनाने निर्णय घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तसेच घरकुल मंजूर झालेल्या राज्यातील लोकांना आता मोफत वाळू मिळणार आहे. खरं पाहता वाळू अभावी घरकुलाची काम राज्यात मोठ्या प्रमाणात रखडली होती.

शिवाय घरकुलासाठी मंजूर झालेल्या रकमेत घरकुल लाभार्थ्यांना घर बांधणे म्हणजे अवघड काम बनले होते. त्यामुळे लाभार्थ्यांच्या माध्यमातून शासनाने मोफत वाळू दिली पाहिजे अशी मागणी शासनाने नवीन धोरण जाहीर केल्यानंतर होत होती. दरम्यान आता राज्याच्या महसूलमंत्र्यांनी घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे.

निश्चितच यामुळे घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे मात्र शासनाकडून फक्त मोफत वाळू मिळणार आहे. वाहतुकीचा खर्च लाभार्थ्याला स्वतः करावा लागणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, मोफत वाळूसाठी सक्षम प्राधिकारी यांनी सादर केलेली यादी संबंधित तहसिलदार यांनी तपासून घेतल्यानंतर तहसीलदारांनी लेखी परवानगी मिळणार आहे आणि मग वाळू डेपोतून घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

किती वाळू मिळणार फ्री

शासनाच्या या नवीन धोरणानुसार आता घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी मोफत वाळू मिळणार आहे. घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत मोफत वाळू दिली जाणार आहे. यानुसार भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मोफत वाळू वाटपाचे काम सुरु झाले आहे.

निश्चितच शासनाच्या या निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वास्तविक, अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण आखले आहे.

दरम्यान आता या वाळू धोरणाअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे शासनाच्या या निर्णयाचे नागरिकांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe