Indian Railway Ticket Fare : भारतात गेल्या काही वर्षांपासून दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे व्यवस्था बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामागील कारण असे की भारतातील बहुतांशी जनता ही रेल्वेने प्रवास करत असते. सोयीचा, सुरक्षित आणि जलद गतीने प्रवासासाठी रेल्वेला पसंती दिली जाते. यासोबतच रेल्वे मार्गे प्रवास करणे रस्ते मार्गे प्रवास करण्यापेक्षा अनेक पटीने स्वस्त असते.
यामुळे स्वस्त आणि झटपट प्रवास यामुळे रेल्वे प्रवासाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रेल्वेचा प्रवास आवडतो. दरम्यान आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना मोठी भेट मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, रेल्वे मार्गे प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना लवकरच तिकीट दरात सवलत अनुज्ञेय केली जाऊ शकते. वास्तविक कोरोना महामारीच्यापूर्वी जेष्ठ नागरिकांना रेल्वेमध्ये तिकीट दरात 50% सवलत दिली जात होती.
हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामान अंदाज; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अति-मुसळधार पावसाचा इशारा, एप्रिलमध्येही ‘या’ तारखेला कोसळणार…
मात्र कोरोना नंतर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून ही सवलत काढून घेण्यात आली आहे. तेव्हापासून बंद करण्यात आलेली ही सवलत आता पुन्हा एकदा चालू केली जाऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. ही सवलत ज्येष्ठ नागरिकांसाठी पुन्हा एकदा बहाल झाली तर निश्चितच ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेचा प्रवास आणखीनच सोयीचा आणि स्वस्त होणार आहे. यामुळे जेष्ठ नागरिक पुन्हा एकदा सुखावणार असल्याचे चित्र आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की संसदेच्या एका समितीने रेल्वे मंत्रालयाला कोरोना पासून बंद करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांसाठीची 50% तिकीट दराची सवलत पुन्हा एकदा लागू करण्याची मागणी केली आहे. स्लीपर क्लास आणि थ्री एसी मध्ये प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ही सवलत पुन्हा एकदा अनुज्ञय व्हावी अशी या समितीची विनंती आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! म्हाडाने अनामत रकमेबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर
संसदीय समितीच्या या विनंतीचा जर रेल्वे मंत्रालयाने मान ठेवला आणि जेष्ठ लोकांना सवलत पुन्हा लागू केली तर निश्चितच हा एक कौतुकास्पद आणि ज्येष्ठांसाठी सुखद निर्णय राहणार आहे. वास्तविक याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 2022 मध्ये माहिती दिली होती. वैष्णव यांनी जेष्ठांना बंद करण्यात आलेली तिकीट दरात सवलतीची योजना पुन्हा सुरू करता येणे अशक्य असल्याचे त्यावेळी सांगितलं होतं.
अश्विनी वैष्णव यांच्या मते रेल्वेचे पेन्शन आणि पगाराचे बिल खूप जास्त आहे यामुळे ही सवलत पुन्हा लागू करणे अशक्य आहे. यामुळे आता संसदीय समितीच्या या विनंतीचा रेल्वे मंत्रालय खरंच स्वीकार करेल का हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण जर संसदीय समितीच्या या विनंतीचा मान ठेवून रेल्वे मंत्रालयाने पुन्हा एकदा ही सवलत लागू केली तर ज्येष्ठ लोकांना रेल्वेचा प्रवास परवडणारा ठरणार आहे.
हे पण वाचा :- लालपरीत महिलाराज! महिलांना एसटीमध्ये 50 टक्के तिकीट दरात सवलत; पण यामुळे नाराजगी कायमच, वाचा सविस्तर