50 हजार प्रोत्साहन अनुदानाची शेवटची यादी आली; पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ, तुम्ही पण आहात का यादीत, पहा

Ahmednagar District Farmer Get 11 crore

50 hajar protsahan anudan yadi 2023 : राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काही शासकीय योजना सुरू केल्या जातात. अनेकदा शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच शेतमालाला बाजारात मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेवर फेडता येत नाही. अशा परिस्थितीत हे कर्ज माफ करण्यासाठी देखील योजना शासन काढत असते.

2017 मध्ये वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देखील शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दीड लाखापर्यंतची कर्जमाफी केली होती. यासोबतच गेल्या महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या कार्यकाळात दोन लाखांपर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली.

हे पण वाचा :- State Employee Strike : ब्रेकिंग ! कर्मचाऱ्यांचा संप फुटला; आता ‘या’ मोठ्या संघटनेने संपातून घेतली माघार

2019 मध्ये या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. यासोबतच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी सोबतच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याची घोषणा देखील केली.

तत्कालीन सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला, याचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले. शेतकऱ्यांनी देखील या निर्णयाचे स्वागतच केले. मात्र या सरकारला हा निर्णय आपल्या काळात लागू करता आला नाही. असे असले तरी या वर्तमान शिंदे फडणवीस सरकारने गेल्या सरकारचा हा निर्णय कायम ठेवत ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतची प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली.

हे पण वाचा :- अहमदनगर : जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी सुरू झाले शासकीय हरभरा खरेदी केंद्र, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

या पार्श्वभूमीवर आतापर्यंत चार याद्या प्रकाशित झाले आहेत. चौथी यादी 14 मार्च 2023 रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वीच जाहीर झाली आहे. या यादीमध्ये नाव आलेल्या शेतकऱ्यांना आता आधार प्रमाणीकरण केल्यानंतर प्रत्यक्षात अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे. या चौथ्या यादीत नाव चेक करण्यासाठी मात्र शेतकऱ्यांना आपल्या जवळील आपल्या सेवा केंद्रावर भेट द्यावी लागणार आहे. तूर्तास आज आपण या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही याबाबत जाणून घेणार आहोत.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही प्रोत्साहन अनुदान

  • ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
  • यासोबतच या योजनेचा लाभ आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी लोकसभा, राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा आणि विधान परिषद सदस्य यांना देखील याचा लाभ मिळणार नाही.
  • या योजनेचा केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना देखील लाभ मिळणार नाही.
  • या योजनेचा लाभ महावितरण, एसटी महामंडळ अशा महामंडळात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार नाही.
  • तसेच आयकर भरणाऱ्या व्यक्तींना याचा लाभ मिळणार नाही.
  • यासोबतच 25000 पेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारक जे व्यक्ती असतील त्यांना देखील याचा लाभ मिळणार नाही.

हे पण वाचा :- अरे वा! पुण्याच्या प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या 81 झाडातून मिळवलं तब्बल 11 लाखांचं उत्पन्न, वाचा ही…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe