Bank FD: ग्राहकांना मालामाल होण्याची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी बँकेने घेतला मोठा निर्णय , आता ..

Bank FD:  तुम्ही देखील तुमच्या भविष्यासाठी पैसे जमा करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या अनेक बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवरील व्याजदर वाढत आहे. यामुळे तुम्ही बँक एफडीमध्ये गुंतवणूक करून भविष्यासाठी बंपर पैसा जमा करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आज अनेक बँका आहेत ज्या मुदत ठेवींवर 9.5 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. यातच आता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील मोठ्या बँकांपैकी एक असणारी बँक बँक ऑफ बडोदाने एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.

ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांपैकी एक आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD साठी व्याजदर 30bps ने वाढवले आहेत.  नवे दर लागू झाले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना कमाल 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. 399 दिवसांच्या तिरंगा प्लस ठेव योजनेवर 7.25 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेवर ज्येष्ठ नागरिक 7.75 टक्के व्याज घेऊ शकतात. बँक सामान्य ग्राहकांना 2 वर्ष ते 3 वर्षांच्या FD वर 7.05 टक्के व्याज देत आहे. सामान्य नागरिकांना 6.5 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षे ते 5 वर्षे कालावधीच्या योजनांवर 7.15 टक्के व्याज मिळत आहे. सामान्य नागरिकांना 7-14 दिवस आणि 15-45 दिवसांच्या एफडीवर 3% दर मिळत आहे.

46-90  दिवसांच्या एफडीवर 4.5 टक्के व्याज मिळत आहे. 91-180 दिवसांच्या मुदत ठेवींवर समान व्याज उपलब्ध आहे. 1 वर्ष ते 400 दिवसांच्या FD वर 5.75% व्याज मिळत आहे, ज्येष्ठ नागरिक या योजनेवर 7.25% व्याज घेऊ शकतात.

दुसरीकडे सामान्य ग्राहकांना 400 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 6.75 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे. 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर सामान्य नागरिकांसाठी 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50 टक्के व्याजदर आहे.

हे पण वाचा :-  Moto G13 : जबरदस्त ऑफर ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे मस्त फीचर्ससह येणारा ‘हा’ स्मार्टफोन ; जाणून घ्या ऑफर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe